राजकारण

ग्रामपंचायत वाकान येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून दोन महिला सदस्यांचा राजीनामा

ग्रामपंचायत वाकान येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून दोन महिला सदस्यांचा राजीनामा

 

प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव

 

 

महागांव तालुक्यातिल वाकान ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून चक्क दोन महिला ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला .

 

वाकान ग्रामपंचायत

सौ .सीमा सुनील राठोड व सौ .मनीषा मधुकर जाधव या दोन ग्रामपंचायत महिला सदस्यांनी सरपंचाकडे दिला राजीनामा गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नाली बांधकाम व सिमेंट रस्त्याच्या बांधकामात झाला भष्ट्राचार आणि निकृष्ट दर्जाचे असुन त्या कामात मोठा भ्रष्टाचाराचा झाल्याचा आरोप मासिक सभेमध्ये केला आहे सदस्याचे प्रश्न निकाली लागतनाही .प्रोसिडिंग बुकावर ग्रामपंचायतचा मासिक सभेचा अहवाल मांडल्या जात नाही .ग्रामपंचायत अंतर्गत नाली सफाई व हॅन्डपंप दुरुस्ती ‘ घाणीचे सामाज्य ”स्वच्छता नाही .सरपंच व सचिव यांच्या संगनमताने केला . पंधरावा वित्त आयोगाच्या निधीची अफरातफर कामांचा हिशोब विचारल्यास हिशोब मिळत नाही .तिन वर्षांचा कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे .सन २०२० पासून ते आज पावेतो वाकान येथील विकास काम शुन्यच असल्याने या दोन्ही महिला सदस्यांनी थेट सरपंचाकडे आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे . सरपंच हम करे सो कायदा असा नियम चालवत असल्याने व महिला सदस्यांना ३३ टक्के आरक्षण असुन सुद्धा देखिल संबंधित सरपंच व सचिव यांना केराची टोपली दाखवत आहे . वाकान ग्रां . पं .अंतर्गत आजपर्यंत केवळ एकच ग्रामसभा झाली असून बाकी ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या आहेत . वाकान येथील ग्रां पं मध्ये ग्रामसभा महिला सभा वार्ड सभाच घेन्यात आलेल्या नाहीत . तर गावचा विकास कसा होणार असा प्रश्न या सदस्यांना पडत असल्याने कंटाळून या दोन्ही महिला सदस्यांनी आपल्या सदस्य पदांचा राजीनामा सरपंच वाकान यांच्याकडे दिला आहे पंचायत राज नुसार व ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षांतुन ग्रां पं अंतर्गत किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक असुन याचा विसर मात्र ग्रां . पं . पध्दसिद्ध अधिकाऱ्यांना पडला आहे . या सर्व बाबींना डोळ्यासमोर ठेऊन या दोन्ही महिला सदस्यांनी कंटाळून सदस्य पदांचा राजीनामा देन्याचा पाऊल उचला आहे . यामुळे आजुबाजुच्या परिसरातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *