महागांव / चिलगव्हाण शेत शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार,
एस के शब्बीर महागांव
महागाव तालुक्यातील चिलगव्हाण शेत शिवारात शेतातील गोट्यात बांधून असलेल्या तीन गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात एक गाय जागीच ठार झाली तर दोन गाय जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाली. ही घटना शनिवार दि. १७ ऑगस्टच्या सकाळी १० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार शेतकरी अवधूत कोंडबा लांडे यांचा चिलगव्हाण शेत शिवारात शेत आहे. शेतकरी अवधूत यांनी शुक्रवारी आपल्या शेतातील गोट्यात तीन गाय बांधून ठेवल्या होत्या. मध्यरात्री दरम्यान बिबट्याने गाईवर हल्ला केला. दरम्यान दोन गाय जीव वाचवून पळून जाण्याचा यशस्वी झाली. तर एक गायवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. आज शनिवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर सदर घटना उघडकीस आली, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. सदर घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे २२ हजार रुपये किमतीची गाय जागीच ठार झाल्याने शेतकरी अवधूत लांडे यांनी काळी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालयात आज शनिवारी निवेदन देऊन तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.



