महागांव पुलसांवगी काळी ( टेंभी )शेत शिवारात बिबट्याचे दर्शन .
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
काळी टेंभी, फुलसावंगी सीमेवर आणि चिल्ली (ई) रस्त्यावर दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.
काळी शिवारातील सुनील राऊत यांच्या शेतात आणि चिल्ली रोडवर तीन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यात एक मादा बिबट आणि दोन मोठे बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यानंतर नरवाडे, वैद्य, गंगात्रे, पोलिस पाटील प्रदीप राऊत यांनासुद्धा बिबट्या दिसला. या शिवारात ऊसाची लागवड जास्त असल्याने आणि चिल्ली रस्त्याला लागूनच भानसाईचे जंगल असल्यामुळे या रानडुक्कर, निलगायी असतात. शेतकऱ्यांना संध्याकाळी लवकरच घरी यावे लागत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे मजूरदेखील शिवारात काम करायला धजावत नाहीत. महागाव वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुनील राऊत, प्रमोद चटने, विश्वास वैद्य, विकास नरवाडे, प्रदीप राऊत, विनोद चटने, अमोल किरण चटने, नितीन पांडे, वैभव मोरे, सीताराम
पवार, अनिल राऊत, संजय लिमजे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे