महागांव प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर
महागाव तालुका पत्रकार महासंघातील सर्व पत्रकार बांधवांना कळविताना आनंद होतो की, रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी, पत्रकार महासंघाच्या वतीने आयुष्यमान ई कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान आरोग्य योजना कार्यान्वित केली असून, या योजनेत सहभागी होणाऱ्या कुटुंबांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे, तसेच राज्य सरकारच्या आरोग्य योजनांचाही लाभ घेता येणार आहे. यवतमाळ येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून, या कॅम्पला ही चमू उपस्थित राहून महासंघातील सर्व पत्रकार बांधवांचे आयुष्यमान ई कार्ड तयार करून देणार आहे. या कॅम्प नंतर लगेच एक प्रेस कॉन्फरन्स आणि सुरुची भोज (Nonveg) जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. महागाव तालुका पत्रकार महासंघातील सर्व पत्रकार बांधवांनी या प्रसंगी अगत्यपूर्वक उपस्थिती दर्शवावी ही नम्र विनंती.
स्थळ -सतीश मंगल कार्यालय, उमरखेड रोड महागाव
वेळ – रविवार ४ ऑगस्ट सकाळी ११ वाजता
(टिप – सोमवार ५ ऑगस्ट पासून श्रावण महिन्यास सुरुवात होत आहे. त्यापूर्वी पत्रकार महासंघातील सर्व पत्रकार बांधवांचे गेट-टुगेदर, आयुष्यमान ई कार्ड आणि नॉनव्हेज जेवणाची मेजवानी असा हा कार्यक्रम आहे. कृपया सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती )
महत्वाचे – आयुष्यमान ई कार्ड साठी स्वतःचे आधार कार्ड व कुटुंबाचे राशन कार्ड सर्वांनी सोबत आणणे गरजेचे आहे
-गणेश भोयर अध्यक्ष, महागाव तालुका पत्रकार महासंघ