उमरखेड बस स्टैंड येथे पोफाळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची बस आलीच नाही.
(विद्यार्थ्यांचे झाले हालचे बेहाल)
प्रतिनिधी / सुहास खंदारे पोफाळी.
(दिनांक २ ऑगस्ट)उमरखेड बस स्टॅन्ड वरून पोफळी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची दररोज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान असणारी एसटी बस आठ वाजेपर्यंत आलीच नाही.
त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हालचे बेहाल झालेली दिसून आले.
शाळकरी विद्यार्थ्यांना बस डेपोतील चौकशी विभागातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा उडवा उडीचे उत्तर देऊन विद्यार्थ्यांना अजून परेशानी टाकुन त्यांना सायंकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत थांबून ठेवले, रात्रीची वेळ व पाऊस चालू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दहा मिनिटात, पंधरा मिनिटात बस येणार आहे. सांगून कोणतेही एसटी बस ची व्यवस्था केली नाही.
पाणी पाऊस सुरू झाल्यामुळे सर्व शाळकरी विद्यार्थी बस स्टॉप मध्ये थांबले होते.
यावेळी पोफाळी कारखानाचे माजी सरपंच आनंदराव बरडे व पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून दिली.