गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील भाविकांची गर्दी रस्त्यावर तासनतास ट्राफिक जाम.
गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावरील देवस्थानसह मठ मंदिर आणि अनेक ठिकाणी असलेल्या संत महंतांच्या शिष्यांनी आपापल्या गुरूंची मनोभावे पूजा सेवा करून मोठ्या भक्ती भावात गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांच्या वाहनामुळे गडावरील रस्ते वाहनांनी पूर्ण भरल्याने अनेक तासापर्यंत गडावरील रस्त्यावर ट्राफिक जाम झाली होती
माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे महंत मधुसूदनजी भारती यांच्या दर्शनासाठी भाविकांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती तसेच केरोळी फाट्यावरील योगी श्याम बापू महाराज यांच्या मठावरही मोठ्या संख्येने भावीक भक्त आले होते तर शहरातील श्री देव देवेश्वर संस्थान सह आनंद दत्तधाम आश्रमातील मठाधीश राष्ट्रसंत सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या मठातही हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावल्याने गडावर जाणारा रस्ता भाविक भक्तासह वाहनांनी फुलला होता
गडावरील श्री रेणुका माता मंदिरात अलंकार महापूजेचा कार्यक्रम झाल्याने येथेही हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शन घेऊन आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण केली शहरातील श्री जगदंबा धर्म शाळेतील सभागृहात स्वामी माधवानंद महाराज यांच्या चतुर्मास सोहळ्याला शोभायात्रा सह धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात करण्यात आल्याने येथेही हजारोच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शविली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातही आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला तर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रमात मठाधीश राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांनी आलेल्या भक्तांना उद्देशून केलेल्या कीर्तनामुळे भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन त्यांनी कीर्तनाचा मोठ्या भक्ती भावात लाभ घेतला तर कीर्तनानंतर भावीक भक्तांना आनंद दत्तधाम आश्रमांकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी हजारो संख्येने भावी उपस्थित होते
नांदेड जिल्हा प्रतिनिधी: गणेश राठोड