आरोग्य ताज्या घडामोडी

पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन! 

पुसद /राष्ट्रवादी (एस पी) गटाचे युवक तालुकाध्यक्ष नवाज अली यांचे हटके आंदोलन रस्त्याच्या खड्ड्यात बसून निषेध आंदोलन!

यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर

 

तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील भोजला मार्गावरील रस्त्यांना वैतागून शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी रस्त्याच्या खड्ड्यात बसून हटके आंदोलन दि.१९जुलै रोजी केले.

पुसद ते भोजला मार्गावरील रस्ता काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला असून रस्त्याचे काम सुरू असताना लगतच्या गावकऱ्यांनी निकृष्ट कामाबद्दल वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा तालुका अध्यक्ष नवाज अली यांनी शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात झोपून बसून अनोखे आंदोलन केले. पुसद तालुक्यात अनेक रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे महिला, शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.

अद्यापही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सर्वसामान्य जनता गेली कित्येक वर्षे दुरावस्थेत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच पाऊल ठेवून आहे.या रस्त्याच्या निकृष्ट कामामागे कुणाचा आशीर्वाद आहे, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आली. अन्यथा यापुढे मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *