ढाणकीतील साई श्रद्धा नगर मध्येरात्री चोरट्याने घराचे लॉक तोडुन 20 तोळे चांदीचे दागीने चोरटयानी लंपास केले.
ब्यूरो रिपोर्ट/अजीज खान
ढाणकी शहरात दिवसेंदिवस मोटरसायकलीचे चोरीचे सत्र वाढतच आहे.त्यातच काल मध्ये रात्रीला चोरट्याने बिटरगाव येथील दुरक्षेत्र ढाणकी येथील साईश्रध्दा नगर मध्ये राहणारे श्री. अविनाश दिगांबर पवार , रा. साईश्रध्दा नगर ढाणकी,यांच्या ईथे त्यांचे मालकी चे घर असुन, मागील एक वर्षा पासुन त्यांचे कुटुंब मुलांचे शिक्षणाकरिता नांदेड येथे पत्नी व मुलासंह राहत असतात ढाणकी येथील घरात खाली ते स्वतः राहतात व वरच्या माळयावर दोन भाडेकरू राहतात. प्रत्येक शनिवारला ते सायंकाळी नांदेड त्यांच्या कुटुंबास भेटण्यासाठी जातात .दि.०६/०७/२०२४ रोजी शनिवार सांयंकाळी ०७/००वा सुमारास नेहमी प्रमाणे ते कुटुंबास भेटण्याकरिता नांदेड येथे गेले असता दि.०७/०७/२४ रोजी सकाळी ०५/३० वा सुमारास त्यांच्या वरच्या माळयावर राहणारे भाडेकरू विजय पाटील येमगर यानी त्यांना फोन करून सांगितले की, “रात्री त्यांचे घराचे मेन दरवाज्याचे बाहेरून कडीकोडा लावुन दरवाज बंद केला आहे, तेव्हा पवार यांनी विकास रामराव निकम याना फोन लावुन त्यांच्या घराचे कोणीतरी कडीकोंडा लावला आहे, तरी घराकडे या असे सांगितले त्यांनी येऊन पाहणी केली असता घराचा बाहेरून लावलेला कडीकोडा उघडला तसेच शेजारी राहणारे भाडेकरू यांचा देखील कडीकोडा उघडला असता रात्री दरम्यान त्यांचे घराचे मेन दरवाज्याचे बाहेरून कडीकोडा लावुन दरवाज बंद केला आहे, व दवाज्याची कड़ी तुटलेली दिसली व दरवाज्याचे कुलुप खाली पडलेले दिसले तसेच स्कुटी देखील गायप दिसली .अशी माहिती पवार यांना शेजाऱ्यांकडून मिळताच पवार लगेच नांदेड येथुन सकाळी ०६/०० वा निघुन ढाणकी येथे आले व घराची पाहणी केली असता घरा समोर लावुन असलेली पांढऱ्या रंगाची टिव्ही एस ज्युपीटर एम.एच २९ बी.के ३११९ चेसीस न. MD626EG46J1H55397 इंजिन न.EG4HJ18C3020 असलेली त्यांना दिसुन आली नाही. तसेच बेडरूम मध्ये जावुन पाहीले असता बेडरूम मधीन दोन्ही कपाट उघडे दिसले व त्यातील काही सामान बाहेर काढुन अस्ताव्यस्त दिसले.दिसले.घरात काय काय चोरीला गेले हे पहिले असता एक पांढऱ्या रंगाची टिंव्ही एस ज्युपीटर एम एच २९ बी के ३११९ किमत २०,०००/रू २) चांदीचे चैन १, बाजुबंद १ जोड, जोडव एक जोड, बिचवे, पंचपाळ १, ताट १, निरंजन २ असे चांदीचे वस्तु अंदाजे २० तोळे किंमत १२०००रू ३) नगदी रूपये २२००/रू असे एकुण ३४२००/रू चा मुददेमाल चोरीस गेल्याचे कळाले . पवार यांनी राहते घरी कोणीतरी आज्ञात चोरटयाने दि. ०६/०७/२४ रोजी चे रात्री १.२/०० वा. ते दि.०७/०७/२४ रोजी चे सकाळी ०५/००वा चे दरम्यान वर नमुद साहीत्य चोरून नेल्याचे बिटरगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. बीटरगाव पोलीस स्टेशन चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पो.स्टे. बिटरगाव येथे अप क. २३०/२०२४ कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन पुढील तपास मा. ठाणेदार प्रेम कुमार केदार यांचे मार्गदशनात यांचे पोउननि शिवाजी टिपुर्णे पो. स्टे. बिटरगाव हे करीत आहे.