ताज्या घडामोडी

महाराष्ट्र मीडिया टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड,

महाराष्ट्र मीडिया टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड,

 

महाराष्ट्र चीफ /एस. के. चांद यांची रिपोर्ट

 

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक

सहविचार सभा नाशिक येथील .मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल

येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मागील वर्षाचे मीडिया प्रमुख गणेश राजु भालेराव यांची पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली

या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम ,महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी,

, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, मुंबई विभाग अध्यक्ष महेश मिश्रा,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी सर्व जिल्हा सचिव अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेट बद्दल माहिती व नवीन नियम व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचं नियोजन सांगितले. तसेच मीडिया प्रमुख गणेश राजु भालेराव यांचे इथून मागील काम बघता महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी टेनिस क्रिकेटचे काम महाराष्ट्रात उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांची पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख म्हणून गणेश राजु भालेराव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती केल्याबद्दल

यांची महाराष्ट्र स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट चे फाउंडर कन्हैया गुजर. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष मयुरी गिरी, अमन गुप्ता,भारतीय व महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी,

,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *