उमरखेड/ बिटरगाव ९ वर्षांच्या नाजमिन शेख ने ठेवला रमजानचा पहिला उपवास
प्रतिनिधी: एस के शब्बीर महागांव
इस्लाम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना – सध्या सुरू आहे.बिटरगाव येथील नाजिमिन शेख रमजान या चिमुकली ने १४ तासांचा निर्जल उपवास (रोजा) ठेवल्याने तिचे सर्वत्र कौतुक करण्यासारखे दिसून येत आहे.पवित्र रमजान महिन्याला १२ मार्चपासून सुरुवात झाली. असून दिव्य कुराण १४४२ वर्षांपूर्वी याच महिन्यात अवतरत झाल्याने मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा ठेवून अल्लाह प्रती बात करत असतात.
लहान मुलांना इशपरायन आणि संस्कारक्षम व्यक्ती बनविण्यासाठी बालवयापासूनच त्यांना प्रशिक्षित – करण्याच्या उद्देशाने रोजा ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या एका ग्रामीण भागातील बिटरगाव येथील शेख रमजान यांचे व्यवसाय म्हणून छोटेसे किराणा दुकान आहे हे यांची ९
वर्षांची चिमुकली नाजिमन शेख मुलीने दिवसभर रोजा ठेवून अल्लाह प्रति (ईश्वराप्रति) कृतज्ञ होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली.
इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य • नसल्याचे त्यांनी सिद्ध केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.