महागांव/ जी एम राठोड यांची अवैध रेती गौण खनिजाची तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई.
यवतमाळ प्रतिनिधी एस.के. शब्बीर यांची बातमी
महागांव तालुक्यातील गुंज व दहिवड येथे अवैध गौण खणिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला रोक लगाम लावून महसुल विभागाने दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई दिनांक २० फेब्रुवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान करण्यात आली. सध्या तालुक्यातील अवैध गौण खणीजाची वाहतुक करणाऱ्या वाहणांवर कारवाई करण्यासाठी महागांव महसुल यंत्रनेने मोहीम मार्ग हाती घेतला आहे. रात्रीच्या वेळेस अवैध रीत्या गौण खणिजाची वाहतुक सुरु असल्याच्या माहिती वरून प्रभारी तहसीलदार जी.एम राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
महागाव तालुक्यात अवैध गौण खाणिज वाहतुक करणाऱ्या चे डोके वर आले असून दंडात्मक कार्यवाही करण्याचा आम्ही मोहीम हाती घेतला आहे. महसूल विभागाकडून २४ तास यंत्रणा सज्ज असुन कारवाई करणे सुरु आहे. असे ते म्हणाले अवैध रीत्या गौण खणिजाची वाहतुक करणाऱ्या एकाही तस्कराला सोडणार नाही.
( जी.एम. राठोड – तहसीलदार महागांव )