राजकारण

हिमायतनगत /प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा – प्रथमअब्दुल अखिल यांची मांगणी.

हिमायतनगत /प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा – प्रथमअब्दुल अखिल यांची मांगणी.

 

ब्युरो चीफ.एस.के.चांद.हिमायतनगर

 

हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत शहरातील जवळपास तिनशे ते चारशे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता नगरपंचायत मार्फत अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील गोर गरीब लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे घरकुल योजनेचे नगरपंचायत मधील जे शिल्लक अनुदान आहे त्यामधून लाभार्थ्यांना अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरित करून लाभार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची आमदार साहेबांनी तात्काळ दखल घेऊन घरकुल लाभार्थ्यांना अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरित करणे बाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूर्यकांत ताडेवाड यांना सूचना केली आहे. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सभापती जनार्धन ताडेवाड, गणेशराव शिंदे, रफिक सेठ, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी भाई, योगेश चिलकावार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *