ताज्या घडामोडी

महागांव!अखेर त्या शेतकऱ्यांचे विरूगिरी आंदोलन मागे (पांदण रस्त्याच्या मागणीसाठी तब्बल २२तास टॉवरवर चढुन आंदोलन)

महागांव!अखेर त्या शेतकऱ्यांचे विरूगिरी आंदोलन मागे

(पांदण रस्त्याच्या मागणीसाठी तब्बल २२तास टॉवरवर चढुन आंदोलन)

 

विशेष प्रतिनिधी

महागाव:-शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला टॉवर वर चढून तब्बल२२तास ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्याने प्रशासनाच्या ठोस आश्वासनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे.

 

महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम) येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी असलेला पांदण रस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने त्यांचा रस्त्या मोजमाप करून दिला त्यानंतर आंडगे यांनी स्व खर्चाने रस्त्याचे काम करण्यासाठी जेसीबी आणली असता काही शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला त्यामुळे आपल्या शेतातील ऊस कारखान्याला द्यायचा कसा या विवंचनेत अडकलेल्या आंडगे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक २५जानेवारी रात्री ८वाजताच्या दरम्यान येथील बिएसएनएल टॉवर वर चढून शेतातील ऊस कारखान्याला नेता यावा याकरिता शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याचे काम तत्काळ करण्याची मागणी केली याची माहिती महसूल व पोलिस प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसीलदार जि. एम.राठोड, ठाणेदार सोमनाथ जाधव आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढून मनधरणी केली परंतु आपल्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्याने खाली उतरण्यास नकार दिला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे यांनी सुद्धा घटनास्थळी येवुन आंदोलक शेतकऱ्याची समजुत काढून खा.हेमंत पाटील,प्रशासनातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत शेतकऱ्याचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.दिवस उलटूनही शेतकरी खाली उतरत नसल्याने अखेर सायंकाळी ६वाजता तहसीलदार जि.एम.राठोड, जि. प.बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सतीश नांदगावकर,जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे,पोलिस उपनिरीक्षक सागर अन्नमवार,बिट जमादार दिनेश आडे,अर्जुन राठोड,मंडळ अधिकारी एम. एकुलवार,तलाठी वाघमारे, महसुल कर्मचारी जिवन जाधव हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली असता शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असल्याने जगदीश नरवाडे यांनी टॉवरवर चढून शेतकऱ्या सोबत चर्चा करून प्रशासनाकडे तोडगा काढण्याची विनंती केली असता जि.प.बांधकाम विभागाच्या वतीने १५मे पर्यंत मातोश्री पांदण रस्ता योजनांमधून. रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे तसेच आजमितीला शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला नेण्यासाठी डॉ.मिलिंद कदम किंवा जगदीश जामकर यांच्या शेतातून तात्पुरता रस्ता करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर शेतकऱ्याने आपले आंदोलन मागे घेत टॉवरवरून खाली उतरण्याचा निर्णय घेत आपले आंदोलन मागे घेतले.यावेळी गावकऱ्यांनी आंदोलन स्थळी मोठी गर्दी केली होती तर तब्बल २२तास चाललेल्या या शोले स्टाईल आंदोलनाने मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन असलेल्या महसुल प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले असल्याची चर्चा आंदोलन स्थळी ऐकण्यास मिळत होती.पाचवेळा आंदोलन करून ही शेतकऱ्याला सहाव्या वेळा आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर याला प्रशासनाचे शेतकरी विरोधी धोरणच कारणीभूत असुन हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्यास वेळ नसुन ते आपल्याच तोऱ्यात वागत आहेत त्यामुळे यानंतर जर कोण्या शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ आल्यास त्या दरम्यान मृत्यू झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार समजुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यासंदर्भात पाठपुरावा करून आंदोलन करण्यात येईल.जगदीशनरवाडे( संस्थापक अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समिती)

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *