प्रेम बंधुता जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी अर्धापूरातील मस्जिदमध्ये परिचय कार्यक्रम.
अर्धापूर तालुका प्रतिनिधी :- आपला देश विविध आस्था, पंथ व धर्मांचा देश आहे.सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे राष्ट्रीय एकात्मता,बंधुता,प्रेम जातीय सलोखा वृद्धींगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मस्जिद काय असते ? मस्जिदीमध्ये प्रार्थना कशी केली जाते ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण सर्वांनी इष्ट मित्रांसह उपस्थित राहावे, अल -अमीन सोशल वर्क
8 नवंबर 2023 बुधवार वेळ दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत
अमीर अली मशीद मेन रोड,अर्धापूर जि.नांदेड.
विनीत: अल-अमीन सोशल वर्क ग्रुप, अर्धापूर आणि सर्व मुस्लिम समुदाय संपूर्ण मानवजात एकाच माता पिताची संतान आहे.(पवित्र कुराण) राष्ट्रीय एकात्मता, मानवीय एकता, बंधुता आणि समानता हाच आमचा संदेश आहे