महागांव येते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरली.
गाव तिथे होणार आंदोलन,मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला.
महागांव तालुक्यासह शहरातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा.
महागांव विशेष प्रतिनिधी!
महागाव : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज महागाव तालुक्यातील सकल मराठा समाज एकवटला आहे.येथील विश्राम गृह येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी छोटेखानी बैठक महागाव येथे संपन्न झाली.
तालुक्यातील गावागावात मनोज जरांगे पाटलाला पाठिंबा म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आज दि.३० ऑक्टोंबर सोमवार पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज बांधवांनी उद्या सोमवार पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाची मोठी व्याप्ती असणार आहे.सदर आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असे सकल मराठा समाज बांधवांनी आवाहन केले आहे.आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायचा असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.
शासन आपल्या दारी,या कार्यक्रमाला सकल मराठा समाज बांधवांनी जाऊ नये.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज पाटील जरांगे यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारून सरकारला कोंडीत पकडले आहे.मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याचे सरकार खोटे आश्वासन देत आहे.त्यामुळे समाज बांधवांनी सदर कार्यक्रमाला जाऊ नये असे आयोजित बैठकीत सांगण्यात आले.