राजकारण

महागांव! खडका ग्रामपंचायत ची ५० वर्षाची बिनविरोध निवडणूक परंपरा आजही कायमच. 

महागांव! खडका ग्रामपंचायत ची ५० वर्षाची बिनविरोध निवडणूक परंपरा आजही कायमच.

 

महागाव तालुक्यातील आदर्श व अनेक पुरस्कार प्राप्त गाव म्हणून खडका गावाकडे पाहिल्या जाते . येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा मागील कार्यकाळ संपला व नवीन ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक लागल्यामुळे येथील जेष्ठ नागरिकांची व गावकऱ्यांची सभा सार्वजनिक चावडीवर घेण्यात आली .या सभेमध्ये मागील ५० वर्षाची बिनविरोधची परंपरा आजही कायम ठेवत नवीन सरपंच ,उपसरपंच व सदस्य यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी बाबुराव देशमुख ३ वेळा , डॉ.राजेंद्र पुरोहित, मिराबाई देशमुख, विद्याबाई साळसुंदर, पंजाबराव देशमुख, प्रकाश जमदाडे, संदीप कानडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली होती.आज सरपंचा सौ कमलबाई अरुणराव देशमुख ,उपसरपंच श्री दत्तराव आत्माराम कदम, सदस्य सौ प्रगती रवींद्र हनवते , सौ विद्या दीपक साळसुंदर , श्री पांडुरंग मारुती गायकवाड , श्री संतोष मैनाजी भालेराव ,सौ ऊषा राजेंद्र ठाकरे, सौ पूजा गजानन देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व गावकऱ्यांनी या नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

 

महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *