नांदेड / खा.हेमंत पाटील यांची खासदारकी रद्द करा. आप ची मागणी-ॲड. अनुप आगाशे
नांदेड :- शासकीय रुग्णालयातील डीनला दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल आम आदमी पार्टीचे ॲड. अनुप आगाशे यांच्या वतीने शासकीय रुग्णालयातील डीनला दिलेल्या अपमानास्पद वागणूक दिले म्हणून खा. हेमंत पाटील यांचे सदस्य पद रद्द करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि त्यांच्या गोदावरी बँकेचे पैसे बदल चौकशी करण्यात यावे अशी मागणी करुण काळे फित लाऊन निषेध करण्यात आले.
खासदार हेमंत पाटील शासकीय रुग्णालयात ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयास यऊन भेट दिली. २४ तासांत किती मृत्यू झाले याची माहिती घेण्यासाठी आलो आहोत असे कारण सांगून अधिष्ठाता आणि बालरोग शास्त्र विभागाचे प्रमुख यांना अशासकीय भाषेत बोलून त्यांना जबरदस्ती धक्काबुक्की करत रुग्णालयातील प्रसाधनगृह हातात झाडूने साफ करून घेतले.
रुग्णांचे मृत्यू रुग्णालयातील अस्वच्छता पाहून डीन डॉ. शामराव वाकोडे यांना स्वच्छतागृहाची सफाई करायला लाऊन खासदार हेमंत पाटील यांनी त्या घटनांचे चित्रीकरण व्हायरल केले. याचा निषेध करण्यासाठी बुधवार दि. ५ रोजी आम आदमी पार्टीचे ॲड. अनुप आगाशे यांच्या नेतत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालय समोर खा. हेमंत पाटील यांचा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ली. आ.ॲड. अनुप आगाशे, अमर वाघमारे, बालाजी नागेश्वर, सचिन शिंदे, सोम भारती महाराज काळी फिते लाऊन निषेध करीत निदर्शने केली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.