यवतमाळ / जातिय सलोखा शिबिर आयोजित करा :– रुस्तम शेख यांची मागणी.
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी !- – माहे सप्टेंबर, ऑक्टो या महिण्यात इद ए मिलाद ,गणेश उत्सव , दुर्गा उत्सव इ , उत्सव साजरे होणार आहे .
या प्रसंगी ग्रामीण व शहरी भागातील हिंदु मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सर्व सण , साजरे करावे
या माध्यमातुन हिंदु मुस्लीम समाजा मध्ये बंधुत्व , समतेची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी ,कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी तसेच वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेला आदर्श समाज निर्माण व्हावा या उद्देशाने तालुकास्तरीय जातीय सलोखा शिबिर आयोजित करण्यात यावे या मागणीच्या संदर्भात राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन कळंब व तहसिलदार कळंब यांना निवेदन दिले
या प्रसंगी निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश भवरे उपस्थित होते