ताज्या घडामोडी

उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा

उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा

 

 

शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून ज्यामध्ये शासकीय नौकर भरती हि अंशता बंद केली असून त्या ऐवजी यापुढे कंत्राटी पद्धतीनेच नोकर भरती केली जाणार आहे. हा चुकीचा व युवकांवर अन्याय करणारा निर्णय असुन हा निर्णय शासनाने वापस घ्यावा याकरिता उमरखेड च्या पुरोगामी युवा ब्रिगेड न आज उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.आधीच शासन नौकर भरती काढत नसून कंत्राटी पद्धतीने नोकर भरती म्हणजे युवकांच्या जखमेवर मीठ चोळायच काम शासन करत आहे.कंत्राटी भरती म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आरक्षान बंद करणे असून सरकार ने युवकांच्या भावना लक्षात घेऊन सदर वादग्रस्त निर्णय वापस घ्यावा व पूर्वी प्रमाणेच मोठ्या प्रमाणात शासकिय नौकर भरती काढावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, जिल्हा सचिव सागर शेरे, तालुका कार्याध्यक्ष अविनाश चंद्रवंशी, पंकज दिपके, शाहरुख पठाण, शहराध्यक्ष ईरफान शेख, शहर सचिव रुपेश टिंगरे, चक्रधर काळे पाटील, सचिन चव्हाण, वाघोजी जाधव, शंकर कनवाळे आदी उपस्थित होते.अन्यथा तीव्र आंदोलन कंत्राटी पद्धत बंद करुन लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शासकिय नौकर भरतीची जाहिरात शासनाचे काढावी अन्यथा उमरखेड शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला आम्ही जबाबदार राहणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

शासन म्हणते एका सरकारी कर्मचारी च्या जागी चार कंत्राटी कर्मचारी काम करतात, असं असेल तर मग आमदार खासदार सुद्धा कंत्राटी पद्धतीने एक एक वर्षासाठीच नेमले जावे. आधीच युवक पद भरती निघत नसल्यामुळे परेशान असून कंत्राटी भरती करून शासन एक प्रकारे युवकांच्या जखमेवर मीठ चोळायच काम करत आहे.

 

रुपेश टिंगरे शहर सचिव उमरखेड.

 

उमरखेड/ तालुका प्रतिनिधी: संजय काळे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *