उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.
उमरखेड शहरातील तहसील कार्यासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईल केले आंदोलन.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,सकल मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरु आहे. सरकारकडून आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेतला जात नाही. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संजय बिजोरे आणि पवन सूर्यवंशी मराठा आरक्षणा करिता पाण्याच्या टाकीवर चढून एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असे नारे देत आंदोलन केले.
उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे .