खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मातोश्री शाळेची विद्यार्थिनी प्राची शिंदे प्रथम.
महागाव प्रतिनिधी-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कयाधू- पैनगंगा महोत्सव समिती द्वारा आयोजित हिंगोली लोकसभा अंतर्गत महागाव तालुक्यात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तिरूमला लॉन्स हिंगोली येथे उत्साहात पार पडला . या निबंध स्पर्धेत महागाव तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मातोश्री प्राथमिक विद्यालय महागाव ची विद्यार्थिनी कु. प्राची संदीप शिंदे खडका हिने पटकाविले आहे. पारितोषिकाचे स्वरूप रुपये ३०००/, सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,सुवर्ण क्रांती हळद पुस्तिका व पुष्पगुच्छ माननीय श्री खासदार हेमंत पाटील( हिंगोली लोकसभा मतदारसंघ) , सौ. राजश्री ताई पाटील (अध्यक्षा गोदावरी समूह), माननीय श्री संजय दैनै (मुख्य कार्यकारी अधिकारी जि प हिंगोली) माननीय श्री पवार साहेब (माजी शिक्षणाधिकारी) व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी रामेश्वर जाधव जि प शाळा तिवरंग, तृतीय क्रमांक चि. आदर्श राजु रावते जि प शाळा पोहंडुळ, प्रोत्साहनपर बक्षीस कु. जान्हवी राजेंद्र खंदारे जि प शाळा कलगाव या विद्यार्थ्यांचा सुद्धा अनुक्रमे २०००/,१०००/,७००/ रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, सुवर्ण क्रांती हळद पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला.व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कौतुकाची थाप दिली.महागाव तालुक्यातील २६० विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता.या निबंध स्पर्धेचे लोकसभा समन्वयक शिक्षक श्री दत्ता पडोळे, महागाव तालुका समन्वयक शिक्षक श्री गोपाल बोक्से, स्वियसहायक अढागळे,शिक्षक श्री कपिल टोणे,पालक डॉ संदीप शिंदे, रामेश्वर जाधव,राजु रावते, राजेंद्र खंदारे, बाबासाहेब शिंदे, प्रमिला शिंदे तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व विजेते विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख