जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप सोहळा संपन्न.
दि.28/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजना सन 2022-23 अंतर्गत लाभार्थी पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा, दगडथर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामा गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दगडथरचे सरपंच श्री.देविदास बुरकुले, ग्रामपंचायत सदस्य श्री.दत्तराव ढोले, श्रीमती मथुराबाई चव्हाण, श्री.रामा खराटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालकवर्ग हजर होते.सर्व लाभार्थी विद्यार्थिनींना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.माधव काळे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.अशोक लांडगे यांनी केले, दगडथरचे सरपंच श्री.देविदास बुरकुले, सहाय्यक शिक्षक श्री.राजेश सुगावे, श्री.ईश्वर थडके यांनी मनोगत व्यक्त केले, तर पदविधर शिक्षक श्री.अमोल जाधव यांनी मानव विकास मिशन योजनेबद्दल सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.श्रेयश टोम्पे यांनी केले.