मराठा सेवा संघ महागाव तर्फे एम बी बी एस साठी प्रवेश प्राप्त आरती मळघणे व विवेक भुसारे या विद्यार्थ्यांचा सत्कार
महागाव प्रतिनिधी-मराठा सेवा संघ महागाव व बाबासाहेब नाईक विद्यालय खडका यांच्यावतीने एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्राप्त विद्यार्थी नगर वाडी येथील अल्पभूधारक शेतकरी श्री प्रकाश मळघणे यांची मुलगी कुमारी आरती ही डॉ.विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर या बा .ना. विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीचा सत्कार तसेच राऊतवाडी येथील माजी जि प सदस्य तथा पर्यवेक्षक एच. ई. एस. हायस्कूल हिवरा श्री विलासराव भुसारे यांचा मुलगा चिरंजीव विवेक हा केईएम वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे त्त्यांचा सत्कार मराठा सेवा संघाची दिनदर्शिका, जिजाऊ चरित्र व संत विचार हे पुस्तक, शाल ,पुष्पगुच्छ व पेढे देऊन करण्यात आला व पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आले. कुमारी आरती मळघणे या सत्कारमूर्ती माजी विद्यार्थिनीच्या शुभहस्ते विद्यालयाच्या प्रांगणात एक वृक्ष लावण्यात आला.या सत्कार सोहळ्यासाठी श्री सुनील गोंडे मुख्याध्यापक बा.ना विद्यालय खडका, श्री दत्तराव कदम संचालक महागाव जिनिंग प्रेसिंग, डॉ. संदीप शिंदे मराठा सेवा संघ मार्गदर्शक, श्री अमोल जगताप मराठा सेवा संघ तालुका सचिव, पर्यवेक्षक श्री विलास भुसारे, श्री प्रकाश मळघणे ,शिक्षक श्री विनोद बोडखे ,मारोती काळबांडे ,जी.के राठोड, अनिरुद्ध देशमुख ,पठाण बाबू, ग्रामपंचायत कर्मचारी दशरथ मारटकर, ललिता ताई भालेराव तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख