ताज्या घडामोडी राजकारण

आयुर्वेद महाविद्यालयाचे नाव “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” असे परिवर्तन करण्यासाठी अमरन उपोषणाचा आपचा ईशारा- ॲड. अनुप आगाशे.

आयुर्वेद महाविद्यालयाचे नाव “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” असे परिवर्तन करण्यासाठी अमरन उपोषणाचा आपचा ईशारा- ॲड. अनुप आगाशे.

महाराष्ट्रा चीफ – एस.के.चांद यांची रिपोर्ट

नांदेड:-“शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” नाव परिवर्तन करून “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड”असे करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या समोर दिनांक २६/८/२३ रोजी अमरण उपोषण करण्यात यनार आहे असे निवेदन ॲड. अनुप आगाशे मा. जिल्हाध्यक्ष ली. आ. आम आदमी पार्टीचे यांच्या नेतृत्तवाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

 

निवेदनात असे म्हटले की,शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” नाव परिवर्तन करून “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड”असे नाव परिवर्तन करण्यासाठी दिनांक १६/९/१२ रोजी १) मा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य २) मा. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ३) मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद ४) मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड ईमेल मार्फत निवेदन दिले तरी सुध्दा कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही म्हणून दिनांक १४/११/२२ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे साखळी उपोषण करण्यात आले होते त्यांनी सुध्दा आश्वासन दिले तरी सुध्दा आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून दिनांक २६/१/२३ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अमरण उपोषण करण्यात येत आहे.

गुरू गोबिंद सिंग यांच्या मुळे आज नांदेड पवित्र झाले आहे अश्या महान गुरू चे आज नांदेड शहरात गुरुद्वारा आहे याचे नांदेड जिल्ह्यातील लोकांना अभिमान आहे . आज नांदेड शहरात भारतातून अनेक राज्यातून गुरुचे दर्शनासाठी नांदेडला येतात तर अनेक विदेशातून सुद्धा गुरू भक्त गुरू गोबिंद सिंग यांच्या गुरुद्वारा येथे माथा व दर्शन घेण्यासाठी नांदेड नगरीत येतात ही नांदेड वासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे अश्या महान गुरुचे नाव हे “शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” हे बदलून “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” करण्यात यावे

11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरू गोबिंद सिंग हे गुरु झाले, जेव्हा ते केवळ 9 वर्षांचे होते. वयाच्या 9 व्या वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली समुदायांपैकी एकाची कमान घेणारे गुरु गोविंद सिंग हे केवळ नायक नव्हते तर ते एक भाषा तज्ञ आणि चांगले लेखक देखील होते. त्यांना संस्कृत, फारसी, पंजाबी आणि अरबी भाषांचे ज्ञान होते. त्यांनी अनेक ग्रंथ रचले, जे आजही शीख समाजात उत्साहाने वाचले जातात.

शिखांचे गुरु गोविंद सिंग यांनी 1699 साली खालसा पंथाची स्थापना केली. शीखांच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. गुरु गोविंद सिंग यांनीच गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचे गुरू घोषित करून गुरु परंपरा संपुष्टात आणली.

धर्माच्या रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग यांनी एक एक करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं बलिदान दिलं होतं. यानंतर त्यांना ‘सर्बंसदानी’ (सर्वज्ञ दाता) असेही संबोधले जाऊ लागले. याशिवाय लोक त्यांना कलगीधर, दशमेश, बजनवाले अशा अनेक नावांनी हाक मारत.

“शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” हे बदलून “गुरू गोबिंद सिंघ शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड” करण्यात यावे या बाबत अन्यथा दिनांक १४ नोव्हेंबर २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे साखळी उपोषण करण्यात येईल.

अश्या महान गुरुचे नाव गुरू गोबिंद सिंग शासकीय आयुर्वेद महाविद्याल रुग्णालय व रसशाळा नांदेड असे देण्यात यावे निवेदनात लिहलेली मागणी पूर्ण होईल अशी अपेक्ष्या करतो . निवेदनावर स्वाक्षरी ॲड. अनुप आगाशे, अवदुत पवार, नरेंद्र सिंघ ग्रंथी अदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *