नांदेड शहरांत लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने भव्य एल्गार परिषदेचे आयोजन.
महाराष्ट्र चीफ / एस.के चांद
नांदेड लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त ०१ऑगस्ट २०२३ रोजी वंचित,शोषित,पिढीत,अन्यायग्रस्तांच्या अधिकार,हक्कासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य एल्गार परिषदेचे आयोजन डॉ.अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारी नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते मा.श्री अंकुशदादा गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
या भव्य एल्गार परिषदेलाअ.भा.गुरु रविदास समता परिषद संस्थापक अध्यक्ष तथा अभियंता मा.श्री चंद्रप्रकाशजी देगलूरकर,कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष रावसाहेबदादा पवार,व्ही.जी.डोईवाड,ऍड दत्तराज गायकवाड,एन.जी.पोतरे,जेष्ठ साहित्यिक नागोराव नामेवार,रा.ना.मेटकर,समतावादी एम्प्लॉईज आॅर्गनायझेशनचे बालाजी पाटोळे,प्रा.इरवंत सुर्यकार सर, बी.एम.गोणारकर,डी.एन.शेळके,
एकनाथ रेडे,आदी जण प्रमुख मान्यवर उपस्थित राहणारआहेत.
लोकस्वराज्य आंदोलन जिल्हा शाखा यांच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा क्रांतीकारी विचार, येथील शोषित,वंचित,पिढीत, पददलीत आदिवासी,महिला,कामगार,यांच्या जीवनात ऐतिहासिक बद्दल घडवून आणण्यासाठी महामानवांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचाराचे जागरण जन माणसात घडवून आणण्यासाठी चर्चा व नियोजन करण्यात येणारआहे.तरी या भव्य एल्गार परिषदेला नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नेते पंडीत वाघमारे,संजय खानजोडे, सचिन वाघमारे,नागोराव कुडके,संतोष तेलंग,सुनील जाधव,साईनाथ भिसे, अर्जुन गायकवाड,गोविंद जोंधळे आंबेगावकर,संदिप मेटकर,बाळासाहेब टिकेकर,साईप्रसाद जळपतराव,माणिक कांबळे,पी.जी.केदारे,धोंडोपंत बनसोडे,नागोराव कमलाकर,लक्ष्मण निदानकर,नारायण ईबीतवार,गंगाधर सिंधलोन,यादव कुडकेकर,संभाजी वाघमारे,कैलास सूर्यवंशी,साहेबराव गव्हाळकर,देविदास सुर्यवंशी,दिनेश सुर्यवंशी,चांदु भिसे,मारोती दर्शनकर,पुजा मोरे,गंगासागर टोम्पें आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
लोकस्वराज्य आंदोलन ही सामाजिक संघटना या पूर्वी देखील वेगवेगळ्या विषयावर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परिषदेचे आयोजन यापुर्वीही केलेले होते.नांदेड येथे होणारी भव्य एल्गार परिषद मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपाची व यशस्वी करण्यासाठी संघटनेचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्तेअतिशय परिश्रम घेत आहेत.