जागतिक पर्यावरण दिना निमीत्त वृक्षारोपणाचे आयोजन संपन्न
नांदेड / खतीब अब्दुल सोहेल
मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष श्री. नागेश व्ही. न्हावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनपरिक्षेत्र नांदेड (प्रा.) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय नुतन इमारत कौठा नांदेड च्या प्रांगणात दिनांक ०५.०६.२०२३ रोजी सकाळी ०८: ३० वाजता वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती दलजीत कौर जज, सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांची प्रमुख उपस्थीती होती, त्यांनी उपस्थितांना पर्यावरणासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले व या जागतिक पर्यावरण दिना निमीत्त प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावावे व त्याचे संगोपण करावे जेणेकरुन पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
याप्रसंगी अॅड. स्वप्निल कुलकर्णी (मुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक), अॅड. नय्यूम खान पठाण (उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक) अॅड. सुरेश कुरोलू (विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक), रिटेनर लॉयर अॅड. मंगेश वाघमारे, अॅड. सचिन मगर, अॅड. मनिषा गायकवाड तसेच वनपरीक्षेत्र आधिकारी नांदेड (प्रा) श्री. संदीप शिंदे, उप वनसंरक्षक, नांदेड श्री. केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक नांदेड श्री. भिमसींग ठाकुर व न्यायालयीन कर्मचारी के.जे. भोळे, सुनील चव्हाण इत्यादी उपस्थित होते, वृक्षारोपणा नंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.