उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट
उमरखेड तालुका प्रतिनिधी / विजय कदम.
उमरखेड तालुक्यात ठिक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट व मागील दोन दिवसापासून होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी वर्ग चांगला चिंतेत आहे गार् 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशा स्वरूपात आहे कारण ऊस पिक गेल्यानंतर लागली शेतकरी वर्गाने गहू हरभरा या पिकाची पेरणी केली होती मागील अतिवृष्टीमुळे उसापासून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी वर्ग परेशान होता म्हणूनच ऊस कारखान्याने नेण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करून ऊस कारखान्याला दिला कारण लगेच गहू व हरभरा घेऊन कुठेतरी आपली बरोबरी होईल व दोन पैसे मिळतील या हेतूने पेरणी केली व त्यांचे संगोपन सुद्धा केले व मात्र पीक हाती येताच निसर्गाचा प्रकल्प होऊन अवकाळी पाऊस व गारपीट झाली व हाती आलेले पीक क्षणात होत्याचे नव्हते झाले म्हणजेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हीसकावल्यासारखे झाले त्यामुळे शेतकरी चांगलाच हतबल झाला असून चिंतेत आहे
गहू केळी कांदा टमाटे वांग हरभरा अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत.