विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत
विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेडची दिनांक 11 3 2023 रोजी वार्षिक आमसभा बालकदास मंदिर उमरखेड येथे श्री प्रकाश कानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये जिल्हा सहसचिव श्री श्रीकांत तलवारे साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्री परिमल डोळसकर, उपविभागाचे सर्व उपविभागीय पदाधिकारी माजी केंद्रीय उपाध्यक्ष श्री सुरोशे यांनी, जिल्हा अध्यक्ष श्री देशमुख साहेब से.नि.ना.त पांडे साहेब, से.नी.ना.त श्री कुराडे साहेब, पुसद उपविभाग सचिव श्री इंगळे साहेब,यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व इतर आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते सभेमध्ये सन 2023-24 करिता कार्यकारिणीची निवड करण्यात आली या कार्यकारिणीचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून ब्राह्मणगावचे सुपुत्र श्री राजकुमार गरुडे साहेब यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी श्री एम एस शेख यांची निवड करण्यात आली. सचिवपदी एस व्ही रायपूरकर, सह सचिवपदी गजानन कवाने,कोषाध्यक्षपदी श्री सुनील बोईनवाड,यांची सभागृहातील उपस्थित सभासदांनी पदाधिकारी म्हणून निवड केली
उमरखेड तालुका प्रतिनिधी / विजय कदम