परजना येथील माळ टेकडीवर महाशिवरात्र निमित्त भक्तांची अलोट गर्दी
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथून जवळच असलेल्या परजना येथील माळटेकडीवर महाशिवरात्रीनिमित्त अलोट गर्दी पहावयास मिळत आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असे शिव पार्वतीची मूर्तीमध्ये जोडी असलेले एकमेव मंदिर आहे याच्यानंतर शिखर शिंगणापूरला शिवपार्वतीची जोडी आहे पण ती मूर्तीमध्ये नसून लिंग रुपी आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मंदिर फार पुरातन कालीन आहे उमरखेड तालुक्यातील परजना येथील माळ टेकडीवर निसर्गरम्य परिसरात महादेव मंदिरात महादेव व पार्वतीची मूर्ती पाहावयास मिळत आहे परजना येथील माळ टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले महादेव पार्वतीची जोडीने दगडी मूर्ती असलेले एकमेव पुरातन महादेव मंदिर असल्याने महाशिवरात्रीनिमित्त येथे यात्रा भरत असते यावेळी परिसरातील नागरिकासह राज्याबाहेरील भाविक महादेवांच्या दर्शनाला येतात येथील यात्रेमुळे परिसरातील नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते या मंदिराचा विकास व्हावा यासाठी तेथे लोकवर्गणीतून पाईपलाईननी पाणीपुरवठा होतो माळ टेकडीवर जाण्यासाठी खडीकरण रस्ता बनविण्यात आला आहे मंदिराशेजारी सभामंडप उभारण्यात आला आहे महाशिवरात्रीला येथे भाविकांची अलोट गर्दी असते
उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम