चिंचोली येथे प्रवासी बस सुरु करा रिपब्लिकन युवा सेना व ग्रामस्थांची मागणी.
चिंचोली (संगम) ता. उमरखेड येथील ग्रामस्थांना उमरखेड हे सात किलोमीटर अंतरावरील तालुक्याचे ठिकाण असुन शासकीय, निमशासकीय तसेच बाजारपेठ अश्या विविध बाबीवर चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थांना उमरखेड येथे सातत्याने ये जा करावी लागते. मागील काही वर्षांपासुन बस सेवा खंडित झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग, रुग्ण तसेच गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये – जा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकारणाने सदर मार्गावरील बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी आज रोजी उमरखेड बस स्थानकाचे आगार व्यवस्थपक श्री. मोहन वाकळे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी रंगराव मोटाळे, गणेश सुर्य, माधव मेळेगावकर, मेजर संभाजी हापसे, संदीप राऊत, गौतम नवसागरे, साहेबराव कदम, भीमराव खंदारे, शुद्धोधन दिवेकर, बबन सुर्यवंशी, शाळकरी विध्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमरखेड तालुका प्रतिनिधी विजय कदम