ताज्या घडामोडी

घाटंजी / साहेब मुत्रीघर सापडेना असेल तर शोधून द्या

घाटंजी / साहेब मुत्रीघर सापडेना असेल तर शोधून द्या

 

मुख्याधिकारी साहेबाना घाटंजी बाजारपेठेत येणाऱ्या महिला व पुरुषांची आर्त हाक

 

प्रतिनिधी / अरविंद जाधव

घाटंजी तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो तसेच घाटंजी तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असून यात शंभरच्या वर गावे आहेत आणि या गावांची मोठी बाजारपेठ म्हणून घाटंजीला ओळखल्या जाते. मंगळवार या दिवशी घाटंजीत आठवड्याचा बाजार भरल्या जातो त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून ग्रामीण भागातून महिला व पुरुष आठवड्याचा बाजार करण्यासाठी घाटंजीला येत असतात त्याशिवाय घाटंजी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तालुक्यातील तहसील, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, कृषी विभाग, दवाखाना या संबंधित विविध कामे करण्यासाठी नागरिकांची रोज घाटंजीला गर्दी असते. घाटंजी शहरात पोलीस स्टेशन चौक ते यवतमाळ रोड (खापरी )नाका हाच मेन रस्ता असून याच मार्गांवर सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानें सजवून मांडून बसली आहे त्यामुळे या मेन लाईन वर नागरिकांची मोठ्याप्रमाणात रहदारी असते पण कामे करताना या धावपळीच्या जमान्यात लोकांकडे फुरसदीचा वेळ नसतो त्यामुळे कामाच्या धावपळीत लघवी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याला कोणी रोकु शकत नाही पण घाटंजीत काम करत असतांना एखाद्या महिलांना अथवा पुरुषांना लघवी लागली तर या मेन लाईन ला शोधूनही कुठे सार्वजनिक मुत्रीघर सापडत नाही यामुळे महिलांची मोठी फजिती होतांना दिसून येते पुरुष मात्र पडझड झालेल्या इमारतीचा अथवा भिंतीचा आसरा घेऊन उघड्यावर लघवी करताना दिसतात पण महिलांना तशा ठिकाणी जाने अथवा उघड्यावर शक्य होत नाही कारण लोकांची नेहमी रहदारी चालू राहते त्यामुळे अतिप्रसंगावेळी महिलांना नवीन बसस्टॅण्डच्या मुत्री घराकडे गेल्याशिवाय मार्ग नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे नगर परिषदेच्या मुक्याधिकारी साहेबाना नागरिकांनी आर्त हाक देत मेन लाईनला मुत्रीघर बांधून देण्याची विनंती केली आहे. नगर परिषदेअंतर्गत मुख्याधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ करण्याचा कौतुकास्पद प्रयोग हाती घेऊन ते यशस्वीरित्या राबविण्यात आले पण हे करीत असतांना मुख्याधिकारी साहेबाना मेन लाईनला मुत्रीघर नसल्याची भनकसुद्धा लागली नसावी का? असा नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे दिसून येते. घाटंजीत मजूरवर्ग दिवसभर काम करतात काम करतांना अधोमधी लघवी लागली तर त्यांना काम सोडून मुत्रीघर शोधत -शोधत बसस्टॅन्ड कडे लघवी करायला जावं लागत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे नगर परिषद याकडे लक्ष देऊन लोकांच्या सोयीसाठी व महिलांची होणारी फजिती अथवा गैरसोय टाळण्यासाठी पोलीस स्टेशन चौक ते खापरी नाका यवतमाळ रोड या मेन लाईनला जास्त रहदारीच्या ठिकाणी एखादी मुत्रीघर बांधून देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *