ताज्या घडामोडी

स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन  बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन 

स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 

बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन

 

उमरखेड प्रतिनिधी सुभाष वाघाडे :- पुसद रोड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात बाळासाहेबांच्या शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले .

 

बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांच्या वतीने दि 17 नोव्हेंबर रोजी हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचीत्त साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

तालुक्यातील सर्व बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे विचार पुढे चालावे व मनी बाळासाहेबांचे विचार घेऊन हिंदुत्वाचा झेंडा घेऊन बाळासाहेबांचे विचार सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम येथील नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले अतुल मैड व त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते संतोष जाधव, विनोद मेश्ररे, जस्विन घनघाव ,अजय नरवाडे, वैभव जोगदंड, गणेश पानपट्ट ,अरविंद खांजोडे, अक्षय पवार ,बजरंग पवार, चंद्रकांत कांबळेसह शेकडो कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस पूजन करून अभिवादन केले .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *