ताज्या घडामोडी राजकारण

गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.

गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.

 

गुंज,सवना,कलगाव ते महागाव रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे शाळकरी विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करत असतात सवना गुंज साइटवरील नॅचरल शुगर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऊस वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव माजी सभापती गजानन कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रवीण ठाकरे मराठा सेवा संघाचे डॉ संदीप शिंदे उदय नरवाडे युवासेना संघटक ऋषिकेश बलखंडे कय्याम नवाब वामनराव देशमुख यांनी दिला यावेळी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाने यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.

 

लतीफ शेख यांची बातमी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *