प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल.
लोहा : नांदेड / विशेष प्रतिनिधी
आज दिनांक 28 .10. 2022 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता सर्व जनतेच्या , पदाधिकाऱ्यांच्या , कार्यकर्त्यांच्या उपस्थिती रास्ता रोको आंदोलन झाले..
यामध्ये खालील प्रश्न मार्गी लागले
1) माळाकोळी ते सावरगाव डांबरीकरण रस्ता एकूण पाच किलोमीटर पैकी अडीच किलोमीटर येत्या मार्चपर्यंत
तात्काळ मान्यता मिळाली व मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे ठरले व उर्वरित अडीच किलोमीटर रस्ता अर्थसंकल्पात मंजुरी मिळवून घेऊ असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले…
2) माळेगाव यात्रा येथे दोन्ही बाजूला जंक्शन व मधल्या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे राष्ट्रीय महामार्गाने मान्य करून लवकरच काम हाती घेऊ असे लेखी आश्वासन दिले..
3) शनी मंदिर लोहा ते पारडी, रस्त्याचे काम दोन दिवसात सुरू करण्याचे ठरले, शंभर टक्के धुळीचे प्रमाण दोन दिवसात बंद करणार असे लिखित आश्वासन राष्ट्रीय महामार्गाने दिले
आंदोलन स्थळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिखित आश्वासन दिल्यामुळे.. तात्पुर ते आंदोलन स्थगित करण्यात आले.. याप्रसंगी
सर्व सर्व पत्रकार बांधवांचे, सर्व पोलीस बांधवांचे,जनतेचे, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, उपचर मन, सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे तसेच दखल घेतल्याबद्दल सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार… जय प्रहार