मुखेड/ मौजे सावळी येथील मातंग नविन वस्तीवाढ व स्मशान भुमि मंजूरीबाबतचे मा.जिल्हाधिकारी,नांदेड याना निवेदन!
मुखेड,नांदेड/एस के चांद यांची बातमी
मुखेड तालुक्यातील मौ.सावळी ता.मुखेड येथील मातंग समाज व तत्सम मागासवर्गीयांसाठी जुनी आणि कमी जागेची वस्ती आहे,आता लोकसंख्या वाढीमुळे वर्षानुवर्षे पासुन वडिलोपार्जित कमी जागेत वाढत्या कुटुंब लोकसंख्येमुळे तेथील मागासवर्गींना इतर अडचणी प्रमाणेच लाहान-लाहान घरातुन जीवनसंसार चालवणे खुपच अडचणी चे,जिकरीचे झाले आहे,मौ.सावळी ता.मुखेड गावालगतच्या जमिनी या हटकर नाईक या ओबीसी सर्वण समाजाच्या असल्यामुळे हे सर्वण ओबीसी नाईक हे तुम्हा मागासवर्गीयांना आम्ही तुम्हाला आमच्या जमिनीतील प्लॉट खरेदी दिले तर गावातील उच्चवर्णीय समाज तिथे कुणी प्लॉट खरेदी करत नाहीत,त्यामुळे हे हटकर नाईक मंडळी जमिन मालक असल्यामुळे मागासवर्गीय समाजास राहाण्यासाठी प्लॉट खरेदी देत नाहीत,त्यामुळे अशी कोंडी मागासवर्गीय समाजाची होत आहे, ही मौ.सावळी ता.मुखेड येथील मातंग समाज व तत्सम मागासवर्गीय समाजाची वास्तव स्थिती आज ” अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक-अध्यक्ष सतिश कावडे आणि मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष मच्छींद्र गवाले ” यांच्या नेतृत्वाखाली मौ.सावळी ता.मुखेड येथील मातंग समाज व तत्सम मागासवर्गीय समाजातील महिला-पुरूष च्या शिष्टमंडळाने आज दिनांक: 20 सप्टेंबर 2022 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी मा. प्रदिप कुळकर्णी यांना भेटुन मौ.सावळी ता.मुखेड येथील मागासवर्गीयांसाठी नविन वस्तीवाढ व स्मशान भुमि मंजूरीबाबतचे निवेदन देण्यात आले.