महागांव येथील संजय चिंतामणी.यांना विदर्भ आयडॉल पुरस्काराने गौरविले
प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव
समाज भूषण संजय चिंतामणी हे सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व असून , ते भाजपा पक्षाचे पदाधिकारी आहे , ते गेल्या पंचवीस वर्षापासुन सतत सामाजिक उपक्रम राबिवले.२५ वर्षात मेडिकल कॅम्पस, रक्तदान शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, चे आयोजन ते करीत आलेले असून ,covid19च्या करोना काळातही त्यानी रुग्णांना अनेक प्रकारे मदत केली, राजकारणातून ते गरजु लोकांनाही सतत विवीध कार्यात मदत करीतआले . महागाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना पाठिंबा देऊन अग्रेसर पत्रकारा सोबत दिसून आले
त्याच्या हया सामाजिक उपक्रमाची नोंद घेत राज्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या “ऑन धिस टाईम”मीडियाने त्यांना “विदर्भ आयडॉल ह्या पुरस्काराने गौरविले.नागपुरातील वर्धा मार्गावरील ली मेरिडियन ह्या पंचतारांकित हॉटेलं मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला.सुप्रसिध्द अभिनेते तथा नाम फाउंडेशन चे संस्थापक मकरंद अनासपुरे, राज्यांचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, परतवाडा येथील स्व. अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बाल अनाथलयांचे संस्थापक अध्यक्ष, अनाथाचे नाथ डॉ. शंकर बाबा पापळकर. आणि ऑन धिस टाईम मिडियाचे अध्यक्ष संदीप थोरात इ. महानुभावाच्या हस्ते संजय चिंतामणी ह्यांना “विदर्भ आयडॉल पुरस्कार “प्रदान करण्यात आला , ह्या वेळेस विदर्भातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज भूषण व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हया मानाच्या पुरस्काराने संजय चिंतामणी ह्यांना गौरविण्यात आल्याबद्धल भाजपा लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.