क्राईम डायरी ताज्या घडामोडी

पोळा गणेश उत्सव कायद्याचे पालन करुन शांततेने साजरा करा-अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे

पोळा गणेश उत्सव कायद्याचे पालन करुन शांततेने साजरा करा-अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे

 

पोळा व गणेश उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

 

 

अर्धापुर /खतीब अब्दुल सोहेल

पोलिस स्टेशन मध्ये पोलिस प्रशासना तर्फे पोळा व गणेश उत्सवानिमित्त आज दिनांक:- 24/08/2022 रोजी कर्तव्यदक्ष पोलिस अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे, यांचे प्रमुख उपस्थितीत व् तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील मॅडम तसेच अर्धापुर पोलीस निरीक्षक अशोक जाधव व अर्धापुर तहसीलदार पांगारकर मॅडम व अर्धापुर मुख्यधिकारी शैलेश फडसे यांचा मार्गदर्शनखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली,

सदरील शांतता समितीच्या बैठकी मध्ये पोळा व् गणेश उत्सव कायद्याचे पालन करुन शांततेने साजरा करण्याचे अव्हान पोलिस प्रशासना तर्फे करण्यात आले, व् तसेच भोकर अप्पर पोलीस अधीक्षक विजय काबडे यांनी गणेश उत्स्वात काही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने काही अधिसूचना जारी केले आहेत, ते आधी सुचना खालील प्रमाणे आहे,

गणेश मूर्ति स्थापने चा जागी कोणतेही अनुचित प्रकार घड़ू नये याची पुरे पुर जबाबदारी गणेश मडळानीं घ्यावी त्यांनी त्या गणेश मंडळा तर्फे स्वसेवक तैयार करुन त्यांचे देख रेखीत रात्र दिवस मूर्ति स्थापनेचा जागी पाहणी करायची, डीजे ला प्रवानगी नाही,

जर कोणी लावले तर त्याचे आवाज 75 डिसिप्ले पेक्षा जास्त राहु नये पर्यावरण कायद्याचे पालन नाही केल्यास कायद्या प्रमाणे त्यास 5 लाख रुपये दंड, व शिक्षेचा प्रवधान आहे, गणेश उत्सवात गणेश मिरवाणुकीचा वेळी इतर धर्मयांची भावना दूखल असे अक्षेपारहय गाने लावू नये, फक्त भगती गीते लवावी, अन्यथा कोणी आक्षेप घेतल्यास किंवा त्याबद्दल काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांचेवर कड़क कार्यवाही करण्यात येईल,

गणेश मंडळाने देखावे सादर करीत असतांना इतर धर्मियांची मने दुखविन्यासारखे दिखावे करू नए, गणपती चे दर्शनास मूली महिलांची छेळ छाळ होऊ नये याची पुरे पुर दक्षता गणेश मंडळानीं घ्यावी असे सक्तीचे निर्देश पोलिस प्रशासना तर्फे देण्यात आले आहे,

यावेळी अर्धापुर तहसीलदार पांगारकर मॅडम अर्धापुर नगर पंचायत चे मुख्याधिकारी शैलेश पडसे, संपूर्ण तालक्याचे पोलिस पाटिल,सरपंच, ग्रामसेवक, व तसेच हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिक अर्धापुर चे

अध्यक्ष छत्रपती कानडे उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसावीर खतीब अर्धापूर नागरिकचे सर्व नगरसेवक ,असे अनेक प्रतिष्ठित नागरिक , आजी माजी भावी नगर सेवक व् असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते,

या कार्यक्रमाचे सूत्र संचलन मदन साहेब पत्रकार यांनी केले, व सह पोलीस निरीक्षक अशोक जाधव साहेब, यांनी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार पोलिस पाटिल सरपंच ह्या सर्वांचे आभार मानले,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *