बनावट चलनी नोटा प्रकरणातील आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी घेतले जाळ्यात
मुख्यसंपादक / एस के चांद हिमायतनगर
पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी गु.रं.न.2021 कलम 420, 489 ब.क. 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी मागील दिड वर्षापासून फरार होते त्या आरोपींस हिमायतनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज दि 24 जुलै रोजी अटक करून त्यांना एम.सी.आर करण्यात आल्याची माहिती हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी दिली,
हिमायतनगर पोलीस स्थानकात बनावट चलने नोटा प्रकरणी गुन्हा नोंद असलेले आरोपी शेख सत्तार शेख बाबू राहणार आंबेडकर नगर बारड ,शेख मेहबूब शेख रसूल राहणार शेख फरीद नगर भोकर ,विकास संभाजी कदम राहणार टाकराळा यांना सदर गुन्ह्यात वेगवेगळ्या तारखेला अटक करून त्यांच्याकडून तपासामध्ये शंभर रुपयाच्या पाच नोटा ,दोनशे रुपयांच्या 41 नोटा ,आणि पाचशे रुपयांच्या 47 नोटा असा एकूण 93 बनावट नोटा या गुन्ह्यात वापरल्या व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली त्यातील एक आरोपी नामे गजानन बालाजी माने राहणार पारवा तालुका हिमायतनगर हा मागील दीड वर्षापासून फरार असल्याची माहिती हिमायतनगर पोलिसांना होती पण तो आज हिमायतनगर येथे आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.बी. चौधरी, पो.हे. का. सिंगणवाड, म.पो.हे.का. कांगणे. ना.पो.का.नागरगोजे, पो.का. जिंकलवाड यांनी मोठ्या सीताफिनेस सापळा रचून फरार आरोपी गजानन बालाजी माने यांना पकडून पुढील कारवाई करीत आहेत सदरील कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे साहेब, सा.अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अर्चना पाटील मॅडम, सह मा. पोलीस निरीक्षक भुसनूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे