टेंभुर्णी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने पळवीले
हिमायतनगर प्रतिनिधी ;
हिमायतनगर तालुक्यातील मौ टेंभुर्णी येथे दि 22 रोजी रात्री बारा च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून काही सोन्या चांदीचे दागिने पळविले असल्याची घटना घडली आहे.
हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरूच असून पळसपुर,सवना,वाशी अशा अनेक गावात चोऱ्या झाल्या असून त्यांत टेभूणी येथे दि 22 जुलै रोजी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती त्यात गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी संदीप माधवराव देवसरकर यांच्या घरात रात्री बारा वाजताच्या सुमारास घरात घुसून घरातील असलेल्या कपाट तोडून त्यामधील ठेवलेले झुंबर काही चांदीचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे गावाकऱ्यात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची माहिती टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य दयानंद भाऊ वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे