वाशीम जिल्हा मालेगाव हत्येच्या निषेधार्थ महागांव तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव.
आज महागांव येथील तहसील कार्यालयात सराफा आणि सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संजय चिंतामणी आणि सदस्य सोनार बांधवांनी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील सोनार व्यवसायीका च्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ. महागांव तहसील कार्यालयात निवेदन दिले. मालेगाव येथील अंजनकर ज्वेलर्स. हे सोनार व्यावसायिक दुकान. दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी रात्रीच्या वेळा चोरट्यांनी दुकान फोडण्याच्या प्रयत्नात प्रयत्न केला होता परंतु त्या चोरट्याचा शोध घेण्यास पोलिस यंत्रणा. कुचकामी ठरली असून त्यामुळे त्या चोरट्यांचे मनोबल जास्त वाढले आणि त्यांनी परत 21 /12 /2021 रोजी रात्री पाळत ठेवून अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर आणि त्यांचे कारागीर रविंद्र लक्ष्मण वाळेकर यांचेवर हल्ला केला व त्यांनी रविंद्र वाळेकर या. कारागिरीची अमानुषपणे. हत्या त्या चोरट्यांनी केली.. योगेश अंजनकर यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला करून त्यांचे जवळ असलेल्या बॅगमधील सोन्याच्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले ही घटना संपूर्ण पोलीस प्रशासनाला. आव्हानात्मक आहे
आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील सर्व सोनार व्यवसायिक आपली दुकाने बंद ठेवून रस्त्यावर उतरतील. असे निवेदन द्वारे महागांव सोनार संघटनेने शासनास कळविले. ह्यावेळी ( अध्यक्ष संजय चिंतामणी. उपाध्यक्ष दिगंबर माळोदे. सचिव राजेश माळवे. राजेश दारव्हेकर. चंद्रकांत लाभसेटवार. नामदेव यादव.नत्थू
दारव्हेकर हे सर्व महागांव सोनार संघटने कडून झालेल्या वाशीम जिल्ह्यात मालेगाव हत्या प्रकरणी ही घटना घडली त्या हत्याप्रकरणी हे सर्व महागाव तहसील कार्यालयात जाऊन यांनी निवेदन दिले