भोकर मध्ये अंगणवाडी कर्मचारी जिल्हा अधिवेशन सपन्न.
अंगणवाडीचे खाजगीकरण करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव: राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शूभा शमीम यांचे प्रतिपादन
भोकर( तालुका प्रतिनिधी)
भोकर अन्न, आरोग्य, शिक्षण ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या सरकारला पुरवाव्या लागतात ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचा 90% विकास ह्याच वयात होतो त्यांची क्षमता विकसित होते सरकार आणि नागरिक यांना जोडणारा दुवा अंगणवाडी सेविका आहेत, ते सरकारचे हात आहेत सरकारचे मूलभूत कर्तव्य अंगणवाडी सेविका पार पाडतात या अंगणवाडीचे खाजगीकरण करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव
असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी (सीटू संलग्न) शुभा शमीम यांनी भोकर येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अधिवेशनात बोलताना व्यक्त केले.
भोकर येथे दि.15 जुलै 2022 रोजी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे (शीटू) नांदेड जिल्हा तिसरे अधिवेशन येथील गणराज मंगल कार्यालय रिसॉर्ट मध्ये पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते एल.ए.हिरे हे होते तर स्वागताध्यक्ष सुलोचनाताई ढोले ह्या होत्या, प्रमुख अतिथी म्हणून मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ, वर्ल्ड व्हिजनचे प्रकल्प अधिकारी शाम बाबू पट्टापु यांची उपस्थिती होती, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जनरल सेक्रेटरी कॉ. शुभा शमीम, राज्य कार्याध्यक्ष कॉ. अण्णा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. विजय गाभणे, कार्याध्यक्ष कॉ. अर्जुन आडे, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. दिलीप पोत्रे कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. शैलजा आडे, कॉ. अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना कॉ. शुभा शमीम पुढे म्हणाल्या केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास कोण सक्षम आहे हे शोधण्याची प्रथम गरज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अधिकार दिला आहे मूलभूत हक्क शासनाने पुरवणे गरजेचेआहे,अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामाच्या मोबदल्यात वेतन मिळत नाही, पगार वेळेवर नाही, प्रवास भत्ता वेळेवर मिळत नाही ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे काम कायमस्वरूपी आहे मात्र केंद्र शासनाने योजना तात्पुरती ठेवली ही चूक आहे न्यायालयाने सांगून सुद्धा योजना कायम केली जात नाही इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी म्हणून शीटु संघटनेचची मागणी आहे देशात 14 लाख अंगणवाड्या असून 27 लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत आता आपणास दिल्लीत धडकल्याशिवाय वेतनश्रेणी मिळणार नाही 2014 साली मोदी सरकार आले तेव्हा योजना धोक्यात आणली योजना आयोगच बरखास्त करून टाकला पुन्हा नीती आयोग आणला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनावर ठेवून भ्रमनिरास केला फसवणूक करून शोषण करणे चालू आहे भ्रमनिरासतेचा भोपळा सरकारच्या डोक्यावर फोडावा लागेल केंद्र सरकारला धारेवर धरण्यासाठी दिल्लीतील सिटु संघटनाच काम करेल, सर्व देशभर त्यांची ताकद आहे पतसंस्थेपुरत्या संघटना काही कामाच्या नाहीत ते महाराष्ट्रातही काम करू शकत नाहीत मोदी सरकार अंगणवाड्यांचे खाजगीकरण करण्याच्या विचारात असून धोका निर्माण झाला आहे एका मोठ्या परदेशी संस्थेस सर्व हस्तांतरित करण्याचा त्यांचा विचार आहे पोषण ट्रॅक्टर न्यूयॉर्कमधील एका कंपनीचे आहे बिल गेट्स सारख्या मोठ्या माणसाला खाजगीकरण करून चालवण्यास देण्याचा त्यांचा विचार आहे भविष्यात अंगणवाडीच्या नोकरी कमी करण्याची शक्यता आहे म्हणून सिटु संघटनेची ताकद वाढवा लढा तीव्र करावा लागेल संघटित व्हावे लागेल प्रत्येक गावागावापर्यंत संघटना न्यावी लागेल असेही त्यांनी शेवटी खणकावून विचार मांडले कॉ.अण्णा सावंत, कॉ.अर्जुन आडे, कॉ, विजय गाभणे, कॉ . उज्वला पडळकर, कॉ गंगाधर गायकवाड, पत्रकार बी.आर. पांचाळ, श्याम बाबू पटापु आदींनी आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय समारोप एल.ए. हिरे यांनी केला तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार कॉ. दिलीप पोतरे यांनी मानले. यावेळी प्रज्ञा कदम, अरूणा इनामदार,ललीता ताटे, राजश्री चालीकवार, माया जाधव, मिरा चव्हाण, वनिता पांचाळ, वनिता देवके, अहेमदबी पठाण, किरण विजापूर, बेबी डवरे, कलावती शिंदे, अशा वाघमारे, अरूणा वैष्णव,नफिस शेख नजीर, द्रोपदा राजर राजरपले, कचराबाई हस्से वाड, रेखा नाईके, तक्षशिला हिरे ,किरण विजापुरे, ललिता ताटे ,शिवाजी वारले, गंगाधर दांगट , भिमराव गायकवाड,अनिल कराळे, मारोती कदम यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व सेविका हजर होत्या.