ग्राम विकासात सरपंचाची महत्त्वाची भूमिका : माजी आमदार अमिता चव्हाण
नांदेड प्रतिनिधी :
ग्राम विकासात सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सरपंचां शिवाय कोणतेही कार्य गावांमध्ये होऊ शकत नाही. ग्रामविकासाच्या कामात सरपंचाचे पद हे महत्त्वाचे आहे. सरपंचाची भूमिका सकारात्मक असल्यास गावचा विकास नक्कीच होतो. असे प्रतिपादन माजी आमदार सौ. अमिता चव्हाण यांनी व्यक्त केले. त्या शंकरराव चव्हाण महाविद्यालय,अर्धापूर येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंती निमित्ताने आयोजित ग्रामीण विकासात स्थानिक नेतृत्वाची भूमिका या विषयावर एकदिवशीय सरपंच कार्यशाळेत बोलत होत्या.
याप्रसंगी मंचावर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सौ.अमिता चव्हाण या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ उर्फ अनिल मोरे, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड चे सहसचिव अँड.उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र चव्हाण, आमराबाद येथील जेष्ठ सरपंच शामराव पाटील टेकाळे, अर्धापूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब,डॉ.विशाल लंगडे,प्रवीण देशमुख,प्राचार्य डॉ.के.के.पाटील,कार्यक्रमाचे संयोजक डॉ.रघुनाथ शेटे,डॉ.सोमनाथ बिराजदार,प्रा.स्वाती मदनवाड,डॉ.एम.के.काजी,यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतीमापुजनाने व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ ,शाँल,व डॉ.साईनाथ शेटोड लिखित भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे पुस्तक देऊन करण्यात आला.
अमिता चव्हाण पुढे बोलताना म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी गाव पातळीवर सरपंच, शहर पातळीवर नगराध्यक्ष व नगरसेवक, यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे. प्रत्येकाने आपले काम चोखपणे पार पाडले तर ग्रामीण भागाचा विकास व्हायला काहीच वेळ लागणार नाही. असे त्या म्हणाल्या. सरपंचांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणाची व बदलत्या कामाची माहिती ठेवावी लागते. त्याचबरोबर ते सर्व कार्य सरपंचांना पार पाडावे लागते असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, सरपंचांनी गावातील विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये महिला शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गावातली शेती सुधार प्रकल्प, ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, गावात सार्वजनिक वाचनालय, सुंदर गाव स्वच्छ गाव, याचबरोबर बचत गट यासारख्या विविध योजनांची अंमलबजावणी सरपंचांनी करून गावाचा विकास हा घडवून आणला पाहिजे.आपसातील हेवेदावे बाजूला सारून कार्य केले पाहिजे. विशेषता मराठवाड्यातील सरपंचांनी पश्चिम महाराष्ट्रातील राळेगण शिंदि, हिवरे बाजार या गावचे आदर्श घेऊन आपली गावे त्या पद्धतीने विकसित करावे अशा प्रकारचे आवाहन सरपंचांना एकनाथ मोरे यांनी केले.
सरपंच प्रतिनिधी म्हणून नीलकंठ मदने,सौ.कांचन सूर्यवंशी,मनीषा खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या परिषदेला शुभेच्छा संदेश देताना अँड.उदयराव निंबाळकर साहेब म्हणाले की, सरपंच ग्राम विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो गावाचा कारभारी आहे. गावाचा कारभार त्यांनी सक्षमपणे केला करून विकास साध्य केला पाहिजे.प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सरपंच कार्यशाळा या ग्रामीण विकासातल्या नेतृत्वासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. ग्रामीण विकासातील स्थानिक नेतृत्व यांचे ज्ञान व कार्य करण्याची शक्ती प्रगल्ब करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करणे महत्त्वाचे आहे. यातून सरपंचांच्यामध्ये कार्य करण्याची वृत्ती वाढेल आणि एकूणच त्यांच्या ग्रामीण विकासात योगदान ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते असे ते म्हणाले.
युवा उद्योजक नरेंद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सरपंचांनी गावातील शेतीकडे विशेषता लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांची उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल आणि त्यातून गावचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी गावातील माती परीक्षण, पाणी परीक्षण करणे व सिंचनाचे योग्य नियोजन करून गावच्या शेतीतील उत्पन्न वाढवणे पर्यायाने गावचा विकास घडवून आणणे महत्वाचे मानले. या परिषदेचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ.के.के. पाटील यांनी म्हणाले की,ही परिषद खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य नेतृत्वाला पुढे आणणे व त्या नेतृत्वाचा विकास घडवून आणणे यासाठी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विशेष परिश्रम घेतले. ते म्हणाले की सरपंच परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नेतृत्वाची ग्रामीण भागाचे भूमिका ग्रामविकासात अत्यंत महत्त्वाचे असते. जे गावकरी ते राव न करी, गावातला कारभार कसा करावा या साठी ही परिषद महत्वाची आहे. ग्रामीण पातळीवर नेतृत्व हे सक्षम करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण व शिक्षण देने आवश्यक आहे आणि या अनुषंगाने ही एक प्रशिक्षणात्मक असणारी कार्यशाळा महाविद्यालयाने आयोजित केली. यातून जनजागरण करणे आणि सरपंचाच्या कार्याचा यशोचित गौरव करणे हेही महत्त्वाचं कार्य त्यांनी व्यक्त केले.
परिषदेचे संचलन प्रा. डॉ. मुख्तारोद्दिन काजी यांनी केले. तर आभार कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. रघुनाथ शेटे यांनी मांनले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ.ल.ना.वाघमारे, प्रा.स्वाती मदनवाड,डॉ.साईनाथ शेटोड, डॉ. विशाल बेलुरे. डॉ. विलास चव्हाण, डॉ. आर. बी. पाटील, डॉ. के नजम.डॉ.एस.पी.औराद्कर.डॉ.रत्नमाला मस्के,प्रा.मनीषा पवार,प्रा.जगताप,यांनी सहकार्य केले. या परिषदेसाठी बी.के.गायकवाड कार्यालयीन अधीक्षक,मारुती शिंदे, अरविंद जामगे, सदाशिव शिंगारे, बालाजी पंदिलवाड,रा.से.यो.स्वयंसेवक ओमकार सिनगारे,कृष्णा तीळेवाड,पोले,पटवे गणेश,कृष्णा शेलगावकर,चंदकांत सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. या परिषदेला अर्धापुर तालुक्यातील सरपंच,महिला सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रसंगी सहभागी सरपंचांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. व ही परिषद यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचारी व यात एकूण बेचाळीस सरपंचांनी सहभाग नोंदवून परिषद यशस्वी केली.