ताज्या घडामोडी

उमरखेड / आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे पुरस्थिती गंभीर

उमरखेड / आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे पुरस्थिती गंभीर

 

तालुका प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची बातमी

 

उमरखेड तालुक्यातील या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका आठ दिवसाच्या पावसाने नदी नाले एकत्र झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंतादायक पूरस्थिती

निर्माण झाली आहे . संततधार पावसामुळे दहा दिवसाखाली पेरणी झालेल्या सोयाबीन पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे . नैसर्गिक संकटामुळे आर्थिक नुकसान झाले आहे या आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे मागील पंधरवड्यात समाधान कारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होते पण गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस चालू असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत लहान ओढ्याच्या नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहे तरी तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी ही मागणी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल माने यांनी जिल्हा अधिकारी अमोल येडगे साहेब यांना संपर्क करून मागणी केली असता जिल्हा अधिकारी साहेब यांनी कुषि विभागाला सुचना देण्यात आल्या आहेत असे सांगितले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *