तुळजापूर नागपूर/ राष्ट्रीय महामार्ग उमरखेड ते महागांव नांदगव्हाण घाट आजही अपघाताचे वळण…………………………………………………………………………………………….. प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव………………………………………………………………………………………….. तुळजापूर नागपूर हायवे /उमरखेड ते महागाव मार्गावर नांदगव्हाण घाट मार्गाचे चौपदरीकरण की अपघाताचे माहेरघर संतप्त वाहनधारकांसह नागरिकांचे वेदना लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्येकडे लक्ष देतील का ? प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उमरखेड महागाव नांदगव्हाण घाटामध्ये रगडले बांधकाम पुढील पावसाळा सुरु होण्या पासून वाहन चालकासह नागरिकांना सुटका मिळेल व अपघात ठरणार नाही ना ? अशी भीती वाहनचालकांसह उमरखेड नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात उमरखेड ते महागाव संबंधित ठेकेदारांची मनमानी वाढत असून याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनींचे दुर्लक्ष होत आहे . सतत दुसऱ्या वर्षीच्या महामार्गावरून पावसाळ्यात प्रवास करणारे वाहन चालक , प्रवासी आणि राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जागा देणारे शेतकरी मालक व , शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . उमरखेड ते महागाव महामार्गाचे चौपदरीकरण की मृत्यूचा सापळा , असा सवाल संतप्त वाहनधारकांसह नागरिक उपस्थित करीत आहे . महागाव ते नागपूर पर्यंत महामार्गाचे बहुतांश जवळजवळ ९ ० टक्के काम पूर्ण झालेले असताना उमरखेड ते महागाव २७ किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाचे काम आजही अडकलेले आहे .
