राजकारण

हिमायतनगर / सत्ताधारी कांग्रेस ला एक जागा पोट निवडणुकीवर शिवसेनेच्या दोन ,काँग्रेसचा एक तर भाजपच्या 1 उमेदवाराचा विजय..

हिमायतनगर / सत्ताधारी कांग्रेस ला एक जागा पोट निवडणुकीवर शिवसेनेच्या दोन ,काँग्रेसचा एक तर भाजपच्या 1 उमेदवाराचा विजय..

 

विशाल राठोड यांच्या गटातील दोन उमेदवार भरघोस मतांनी विजयी..

 

पोटनिवडणुकीत दिगज्जांची प्रतिष्ठा लागली होती पणाला..

 

 

हिमायतनगर / एस के चांद यांची बातमी

 

हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी जिल्हा परिषद गटातील मौजे चीचोर्डी , महादापुर व सिबदरा या तीन ग्रामपंचायच्या 4 जगासाठी निवडणूक विभागाकडून दि 5 जून रोजी मतदान घेण्यात आले होते त्याचा निकाल दि 6 जून रोजी जाहीर झाल्या नंतर शिवसेनेच्या दोन ,काँग्रेस एक तर भाजपाचा 1 उमेदवार विजय झाल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले

 

तालुक्यातील मौजे चीचोर्डी ग्रामपंचायत च्या वार्ड क्रं 2 येथील पोटनिवडणुकीच्या जागेवर युवा सेना हदगाव हिमायतनगर जिल्हा समन्वयक विशाल राठोड यांच्या गटातील वैशाली सीताराम देशमुखे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्या पत्नी वनश्री परसराम ढाले हे निवडणूक रिंगणात उभ्या टाकल्या होत्या तेव्हा येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली त्यात विशाल राठोड यांच्या गटा कडून शिवसेनेचे पुंडलिक छत्रपती भिसे यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारास 110 मते मिळाली तर विरोधी गटाच्या उमेदवाराचा 45 मताच्या फरकानी दणदणीत पराभव झाला त्यामुळे आदिवासी गटात सुद्धा शिवसेनेचा दबदबा कायम असल्याचे दिसून आले

त्यामुळे युवा सेना हदगाव हिमायतनगर जिल्हा समन्वयक विशाल राठोड ,शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे, चिचोर्डी येथील गणपत वागतकर ,कांताराव वागतकर ,विजय टारपे ,संभाजी टारपे, सुरेश वागतकर, अनिल तरडे, धरतरी वागतकर ,विलास वागतकर ,विलास भिसे, दत्ता तरटे ,रामदास भडंगे, अरविंद भडंगे सह आदींनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *