यवतमाळ /पुसद येथे बजरंग नगर कवडीपूर परिसरात सिलेंडरचा स्पोर्ट.
एस के शब्बीर यांची रिपोट
पुसद शहराला लागून असलेल्या कवडीपूर येथील दि.४/६/२०२२ रोजी सकाळी११ वाजता बजरंग नगर येथे भिसे कुटुंबाचे घर व त्या घरात भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाचे घर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झाल्याची घटना अभिषेक कुटुंबाचे भाडेकरू कुटुंबाचे आतोनात झालेले नुकसान जवळपास अंदाजे २ लाख ६ हजार रुपयांचे झाले . या दुर्दैवी घटनेत भिशे परिवारात व भाडेकरू यांचे सुदैवाने घर बंद असल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही . याबाबत सविस्तर माहिती अशी की पुसद शहराला लागून असलेल्या कवडीपूर ग्रामपंचायत मधील बजरंग नगर येथील प्रकाश पुंजाराम भिसे यांच्या राहत्या घराला आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा घर बंद असताना स्फोट झाला सुदैवाने त्या खोलीत कोणी नसल्याने जीवित हानी होता होता टळली . परंतु त्यास स्फोटात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबाच्या घरातील टीव्ही , कपाट , दुचाकी , सोने व रोख रकमेसह संसार उपयोगी साहित्य व संपूर्ण सामान जळून खाक झाले . स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूचे नागरिक स्फोटक झाल्यामुळे जमा झाली . त्यावेळी कवडीपुरचे तलाठी ठेंगे साहेब यांनी घटनास्थळ गाठून खाक झालेल्या घराचा पंचनामा करण्यात आला . या आगीमध्ये घर मालकाचे व भाड्याने राहणारा व्यक्तीची अंदाजे २ लाख ६ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी ठेंगे साहेब करण्यात आला . ,