राजकारण

हिमायतनगर शहरात मोठा राजकीय भूकंप…  काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश…

हिमायतनगर शहरात मोठा राजकीय भूकंप…

 काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश…

नांदेड हिमायतनगर : एस के चांद यांची रिपोट

माजी उपनगराध्यक्ष यांनी अखेर काँग्रेसला दिली सोड चिठ्ठी…

हिमायतानगर शहरात आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते समजले जाणारे मागील नगरपंचायती मध्ये उपनगराध्यक्ष पदावर असलेले मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचे नेते म्हणून तालुक्यास परिचित असणारे मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दि 1 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात जाहीर प्रवेश करून एक राजकीय भूकंप केला आहे त्यामुळे आगामी काळात पण हिमायतनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच उभारी घेईल असे बोलल्या जात आहे

 

हिमायतनगर शहरातील काँग्रेसचे पहिले सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय हाजी अब्दुल नसीर शेठ यांचा वारसा लाभलेले त्यांचे पुतणे यांनी काँग्रेस पक्षा सोबत राहून नेहमी मुस्लिम समाजाच्या हिताचा विचार करून मागील ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते त्या वेळेस पक्षांनी त्यांना उपसरपंच पदी विराजमान केले तेव्हा शहरातील मुस्लिम समाजा सह इतर वॉर्डाचा विकास त्यांनी केला होता त्यानंतर सुद्धा त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्या नंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब, माजी पालकमंत्री डी पी सावंत व आमदार साहेब यांच्यावर विश्वास ठेऊन ते नगरपंचायतीवर निवडून आले होते त्यानंतर शहराचे राजकीय समीकरण पाहता नगरपंचायत वर काँग्रेसच्या दहा जागा निवडून आल्या तेव्हा नगराध्यक्षपद सर्वसाधारण ला आरक्षित झाल्यानंतर त्याजागी अखिल भाई यांना आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नगराध्यक्ष केले तेव्हा सर्वांनी त्याला पाठिंबा दिला होता त्यानंतर शहरात अनेक विकास कामे झाली प्रथम नगराध्यक्ष यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी ओ.बी.सी.ला आरक्षण मिळाल्यानंतर ते पद मुस्लिम समाजातील अल्प संख्यक गटाला मिळावे ह्यासाठी काँग्रेस पक्षांतर्गत शर्यत लागली होती तेव्हा विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्याकडे नगरसेवक मो.जावेद यांनी नगराध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती पण त्यांना संधी न दिल्याने पूर्वीच्याच नगराध्यक्षास पुन्हा एकदा नगराध्यक्ष करण्याचे ठरविले होते तेव्हा शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी मिळून नगर पंचायत वर महाविकास आघाडी अस्तित्वात आणली होती त्यानंतर पण अनेक विकास कामे झाले पण नंतर शहरातील हळु हळु राजकीय समीकरण बद्दलत गेल्या नंतर अनेक वेळेस माजी उप नगराध्यक्ष मो.जावेद गणी हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या साहऱ्याणे काँग्रेस पक्षात पुन्हा उभारी घेणार असल्याच्या चर्चा शहरात रंगत होत्या पण तसे न होता शहरातील राजकीय क्षेत्रात बहुचर्चित असलेले व काँग्रेस पक्षाला कंटाळून हिमायतनगर नगर पंचायत वर महाविकास आघाडी अस्तित्वात आणणारे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी आपल्या असंख्य समर्थका सोबत ,माजी नगरसेवक प्रा. महमद खयुम अ. करीम,युवक काँग्रेसचे मो.जुनेद भाई,युवक कांग्रेसचे एस डी आदिल, अ.इरफान सह आदींनी घेऊन त्यांनी दिनांक 1 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटिल यांच्या प्रमुख उपस्थतित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने हिमायतनगर शहरातील राजकीय वर्तुळातील चर्चेला मात्र आता पूर्णविराम मिळाला आहे पण आगामी होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष हे विद्यमान आमदार यांना चागलेच जड पडणार आहेत अशी पण चर्चा शहरात रंगत आहे

 

यावेळी त्यांचे सोबत आदरणीय शरद पवार साहेब यांचे जवळचे समजले जाणारे हदगाव येथील व्यकंटेश पाटिल तालंगकर साहेब,हिमायतनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील पतंगे, राष्ट्रवादी युवककांग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष सरदार खान खलील खान पठान,शहर अध्यक्ष उदय देशपांडे, इरफ़ान खान अहेमद खान पठान सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *