हिमायतनगर तालुक्यातील सवना येथील रानडुकराने धडक दिल्याने युवक जखमी वनविभागाने तत्परतेने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
हिमायतनगर / एस.के. चांद यांची रिपोट
हिमायतनगर-नांदेड दिनांक- 15 मे 2022 रोजी ता. हिमायतनगर मौजे सवना ज. येथील,नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांना प्रशांत पंजाब बिरकलवार वय (28) वर्ष हा शेत सर्वे नंबर 127 मध्ये हि शेतातील रानडुक्कराच्या धडके ही घटना घडली असून एक यूवक जखमी झाला आहे.
त्यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे. हाताच्या दोन कमड्या मोडले असल्याची माहिती उपचारादरम्यान उपचार करत असताना एक्सरे काढल्यानंतर कळाले आहे. अशी माहिती युवकाच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवर दिली आहे यावेळी नाचवीत बोलत होते कि त्या युवकाच्या हातात राॅड टाकण्यासाठी नांदेड येथील दवाखान्यात हलविले आहे.
यावेळी नातेवाईकांनी शेतातील रानडुक्कराचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली
आपल्या प्राणांची बाजी लावून बळीराजा आपल्या काळया आईची सेवा करीत असतो. परंतु वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे जंगली प्राणी वानर, रानडुक्कर, रोई , कोल्हा, लाडंगा, हरीण यासारखे प्राणी शेतातील पिक उद्ध्वस्त करीत आहेत.
त्या पिकांची राखणं करतांना शेतक-याला आपला जिव धोक्यात घालून शेतातील पिकांचे उत्पादन घ्यावे लागत आहे.
या जगंली प्राण्यांचा वेळीच वनविभागाने तत्परतेने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.