किनवट तालुक्यातील कुपट्टी येथील आर्मीतील जवान यांचे हिमायतनगर शहरात लहुजी शक्ती सेना तर्फे सत्कार
ब्युरो रिपोर्ट एस के चांद हिमायतनगर
आज किनवट तालुक्यातील मौजे कुपटी येथील जवान दीपक टोकलवाड हे आर्मी ट्रेणींग पुर्ण करुन ते आपल्या पावन भुमी मौजे कुपटी येथे हिमायतनगर शहरांमधून जात असताना हिमायतनगर येथील लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्मीतील जवान दीपक टोकलवाड हिमायत नगरातील अभय हॉस्पिटल येथे थांबून त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करण्या वेळी हिमायतनगर लहुजी शक्ती सेना चे तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड, युवा अध्यक्ष विकास गाडेकर, तालुका सचिव दयानंद वाघमारे विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रदिप तपासकर या सर्वांची उपस्थित होते