महागांव /फुलसावंगी येथे शाळापूर्व तयारी मेळावा पटसंख्यया वाढविण्याचे लक्ष विविध उपक्रमाने पालकही भारावले
महागांव फुलसावंगी / प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा फुलसावंगी येथे शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला.
दिवसेंदिवस इंग्रजी शाळाकडे वाढत चाललेला कल बघता उर्दू शाळांचा गुणात्मक दर्जा मागे असतो ही बाब इंग्रजी संस्थानी भरविली गेली होती.परंतु आता उर्दू शाळेत ही उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे त्यामुळे उर्दू शाळेचा विद्यार्थी कोणत्याच क्षेत्रात मागे न रहाता तो ही उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येतो. ही बाब पालकांच्या लक्षात येते असल्याने पटसंख्येत वाढ होत आहे हळूहळू उर्दू शाळेचा दर्जा उंचावत आहे.हीच बाब समोर ठेवून फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा येथे नुकताच इत्यता पहिली दखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम शालेय परिसरात बॅनर व फोटो शेसन करण्यात आले आणि दखलपात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आले त्यानुसार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद देत अनेक पालकांनी दिली आणि आपल्या पाल्यांना इत्याता पहिली मध्ये दाखल केले. यावेळी शाळेत एकूण २५ विद्यार्थी दाखल केले आणि मेळाव्याचे कौतुक केले मेळाव्या मध्ये शाळेचे मुख्याध्यापक सोहेल मिर्झा यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये मेळावा आयोजित करण्याचे कारण व दखलपात्र विद्यार्थ्यांकडून १२ आठवडे करून घ्याच्या कृती या बद्दल माहिती दिली व पालकांचे आभार मानले विद्यार्थ्यांना व पालकांना साहित्याचे वाटप करण्यात आले आणि स्वयंसेवक यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मेळाव्याला प्रामुख्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिस शेख व सदस्य समीर नवाब व इतर सदस्य उपस्थित होते शाळेतील शिक्षक जावेद खान,असिफ खान,साजीद खान,मोहसीन खान,व शिक्षिका मसरत जहा ,बिलकीस अंजुम व अंगवाडी सेविका वनिता खडतर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अश्या प्रकारे शाळापूर्व तयारी मेळावा शाळेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.